रत्नागिरी कोषागार कार्यालयाच्यावतीने कोषागार दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी कायालयातील कोषागार कार्यालयाच्यावतीने शनिवारी कोषागार दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोषागार दिनाच्या औचित्याने या कार्यालयात रक्तदान शिबिर, पाककला स्पर्धा, तणाव मुक्त जिवन या विषयावर व्याख्यान, रस्ते वाहतुक सुरक्षा या विषयावर व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, कोषागार अधिकारी मलाप्पा वाघमारे, सहाय्यक संचालक राजू लाकूडझोडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मानसिंग पाटील, अप्पर कोषागार अधिकारी अनिकेत गावडे, उमेश मगदूम, रविराज शिंदे, लेखाधिकारी राजेंद्र भारमल, शरद शिंदे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.