आदिवासी विकास शिष्यवृत्ती वाटप घोटाळा 2100 कोटींचा; 24 शैक्षणिक संस्था बोगस, त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाच्या चौकशीचे निष्कर्ष

पुणे : सामाजिक न्याय व अादिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या गैरव्यवहाराबाबतच्या विशेष चाैकशी पथकाच्या अहवालात २१०० काेटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घाेटाळा झाला असल्याचे निष्कर्ष तीन अायएएस, अायपीएस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाच्या चाैकशीनंतर समाेर अाले अाहे. या गैरव्यवहारात राज्यातील ७० शैक्षणिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात अाली असून २४ शैक्षणिक संस्था बाेगस असल्याचे उघडकीस अाले अाहे. हा चौकशी अहवाल दाेन वर्षे दडपून ठेवण्यात अाला हाेता, परंतु ताे माहिती अधिकारात उघडकीस अाल्याने संबंधित महाघाेटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीअायडी) अाणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्यामार्फत चाैकशी करण्यात यावी ही विशेष तपास पथकाने केलेली मागणी मान्य करण्यात यावी, अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप अांबेकर यांनी केली अाहे. सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने संबंधित गुन्ह्याची सर्वप्रथम माहिती उघडकीस अाणली हाेती.


विशेष चाैकशी पथकात अायपीएस अधिकारी के. व्यंकटेशम, अायएएस रणजितसिंह देअाेल, अायएएस पीयूष सिंग यांचा समावेश हाेता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित चाैकशी समिती जानेवारी २०१६ मध्ये नेमली व समितीने जुलै २०१७ मध्ये शासनाला सादर केला, परंतु संबंधित अहवाल अद्याप उघडकीस अाला नव्हता. माहिती अधिकारात कुलदीप अांबेकर यांनी सदर अहवाल उघडकीस अाणला अाहे. या अहवालानुसार विशेष चाैकशी समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार, समाजकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या १२ हजार ६७९ पैकी एक हजार ७०४ (१३.४३%) शैक्षणिक संस्थांचे व अादिवासी विभागांतर्गत येणाऱ्या ११ हजार सहापैकी एक हजार ६६३ (१५.११%) लेखा परीक्षण करून २१०० काेटींपेक्षा जास्त रक्कम वसूलपात्र ठरवण्यात अाली अाहे. एसअायटीपूर्व शिष्यवृत्ती रक्कम २१ काेटी ३६ लाख २७ हजार हाेती. परंतु एसअायटीनंतर ती ६२ काेटी ३३ लाख एक हजार इतकी तिपटीने वाढलेली दिसून अाली अाहे.


मराठवाड्यातील १४ संस्थांवर ठपका


चाैकशी पथकाने शासनाकडून गुन्हे दाखल करावेत अशा ७० संस्थांची माहिती दिली अाहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय (उदगीर, लातूर), धन्वंतरी अायुर्वेदिक मेडिकल काॅलेज (उदगीर, लातूर), माॅडर्न काॅलेज अाॅफ काॅम्प्युटर सायन्स इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी (नांदेड), स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालय (कंधार, नांदेड), सावित्रीबाई फुले सायन्स व बीसीए महाविद्यालय (वसमत, हिंगाेली), राजश्री शाहू तंत्रनिकेतन विद्यालय (कळंब, उस्मानाबाद), व्ही. जी. शिंदे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय (उस्मानाबाद), पूजा नर्सिंग स्कूल (परळी, बीड), इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (पाटाेदा, बीड), धाेंडे स्कूल अाॅफ नर्सिंग (अाष्टी, बीड), जिजामाता नर्सिंग स्कूल (माजलगाव, बीड), लाेकसेवा नर्सिंग स्कूल (बीड), अंकिता दाैंड इन्स्टिट्यूट अाॅफ नर्सिंग (अंबाजाेगाई, बीड), माणिकदादा कदम पाटील संगणक व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय (तुळजापूर, उस्मानाबाद). मराठवाड्यातील या संस्थांशिवाय, साेलापूर, चंद्रपूर, पुणे, बुलडाणा येथील शैक्षणिक संस्थांचा समावेश असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात अाहे