शरद पवारांना काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगापुढे बाेलावणार; पवारांची उलटतपासणी घेता येईल : आयोगाचे वकील

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना बोलावण्यात येणार आहे. काेरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारचे वातावरण मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी निर्माण केले हाेते, त्यामुळे नंतरची हिंसक घटना घडली, असे विधान पवार यांनी केले हाेते.


या पार्श्वभूमीवर पवारांना चाैकशी आयाेगासमाेर साक्षीसाठी बाेलवावे, अशी लेखी मागणी सागर शिंदे यांच्यामार्फत पुण्यातील वकील प्रदीप गावडे यांनी आयाेगाकडे केली होती. याबाबत माहिती आयाेगाचे वकील आशिष सातपुते म्हणाले, अर्जाचा विचार करत शरद पवार यांनी आयाेगासमाेर प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याने त्यांना लवकरच बाेलावण्यात येईल. या वेळी संबंधित वकिलांना पवार यांची उलटतपासणी घेता येऊ शकेल. शरद पवारांकडे अधिक माहिती असेल तर ती आयाेगाला देणे आवश्यक असल्याचे अॅड. प्रदीप गावडे म्हणाले.